धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या “सदस्यता नोंदणी अभियान“आज महाराष्ट्राचे  लाडके नेतृत्व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या आदेशावरून व आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चाच्याचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदनी अभियान संपन झाले. आज धाराशिव शहर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

धाराशिव शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे कॅम्प च्या माध्यमातून सदस्यता नोंदणीची प्रक्रिया सुरु केली गेली. स्थानिक नागरिक ,युवक युवती यांच्याशी संवाद साधून भारतीय जनता पार्टीच्या विकास कार्याचा भाग होण्याचे आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला .

यावेळी अरुण पाठक प्रदेश उपाध्यक्ष, राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव ,भाजप सरचिटणीस इंद्रजित देवकते, प्र.का.स. प्रविण पाठक, रमण जाधव, दर्शन कोळगे, धत्तुरे नाना, अमोल राजेनिंबाळकर, महेश बागल, मेसा जानराव, रोहित देशमुख ,गणेश एडके, सचिन लोंढे, तालुका अध्यक्ष अजित खापरे शहर अध्यक्ष प्रसाद मुंडे, अतुल कावरे, विद्यार्थी जिल्हा संयोजक धनराज नवले, सुनिल पगुंडवाले, शहर संयोजक चैतन्य माने, सार्थक पाटील, आकाश कानाडे, नवनाथ सोलंकर, सम्यक माळाळे, अभिजीत पवार, यांच्यासह युवा मोर्चातील सहकारी,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top