तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी यांनी आकर्षक किल्ला बनविला.
सह्याद्रीच्या शिखरावरती !
शौर्याच्या ललकारी घुमती !!
गड सांगती शौर्य कथा !
इथे टेकवू क्षणभर माथा !!
धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी किल्ल्याविषयी माहिती मिळवली व
मातीपासून किल्ला बनवला.त्यासाठी परिसरातील दगड, वीटा, माती याचा उपयोग केला.किल्ल्यावर बनवलेले बुरूज ,तोफा,चोरवाटा पाहून त्यांच्या निरीक्षण शक्तीचा प्रत्यय आला.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पाटील ए.एस.,सहशिक्षका सलगर एस.ए.यांचे मार्गदर्शन लाभले.