धाराशिव (प्रतिनिधी)- एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याचे प्रथम गळीत हंगाम २०२४-२५ मधिल चौथा पंधरवाडा १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील गाळपास आलेल्या ऊसाचे बिल जमा करण्यात आले आहे.

एन.व्हि.पी.शुगर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून ऊसाचे बिल पंधरवाडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बील जमा करणारा धाराशिव जिल्ह्यातील पहिला कारखाना आहे. तसेच यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवडा संपल्यावर जमा करण्यात येणार आहे.

 तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.


 
Top