धाराशिव (प्रतिनिधी)- आरोपी माजीदनुरोद्दीन काझी, सय्यद जफर अहमद रियाजोद्दीन काझी, सय्यद इफतेखार इर्शाद अहमद काझी, सय्यद इजाज इफतेखार ईशाद अहमद काझी सर्व रा. सुलतानपुरा धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी फिर्यादी दिग्विजय दिलीपराव देशमुख, वय 42 वर्षे, द्रोपदी बंगला आनंदनगर ता. जि. धाराशिव यांचे सर्वे नं 103/1 छायादिप लॉन्स मंगल कार्यालय धाराशिव येथील जागेवर दि.19.10.2024 रोजी 23.30 ते दि. 20.10.2024 रोजी 06.00 वा. सु. अतिक्रमण केले आहे. तरी फिर्यादी यांनी अतिक्रमण काढून घेण्यास सागिंतले असता नमुद आरोपींनी दिग्विजय देशमुख यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराची फिर्याद दिग्विजय देशमुख यांनी दि.09 जानेवारी 2025 रोजी दिल्याने आनंदनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top