धाराशिव (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील चौय्था माळेदिनी  शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी  श्री तुळजाभवानी मातेच्या  सिंहासनावर  शेषशाही  अलंकार महापूजा मांडण्यात आली होते.

ही महापुजा मांडण्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितले जाते कि, भगवान विष्णू शेषशैय्ये वरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध ब्रह्मदेवाने देवीची स्तुती करून देवीस जागे केल्यावर अंबामातेने त्यांचा वध केला. त्यानंतर विष्णूने आपली शैय्या श्रीदेवीस अर्पण केली. त्यामुळे शेषशाही अलंकार पूजा मांडण्यात येते. या रुपात देवीस सजवले जाते. श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी  नवराञ उत्सवातील चौय्था माळेदिनी रात्री मंदीर प्रांगणात मोर वाहनावर छबिना काढण्यात आला. नंतर महंत वाकोजी, गुरु तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर नवराञोत्सवातील तिसऱ्या  माळेच्या धार्मिक विधीचा सांगता झाली.


 
Top