धाराशिव (प्रतिनिधी)- नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करत असताना सर्वसामान्य नागरीकांच्या कामास प्राधान्य देण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. तसेच सदर आढावा बैठकीदरम्यान प्राप्त झालेल्या 953 तक्रारीपैकी 572 तक्रारींचे तात्काळ निवारण करुन नागरीकांना दिलासा देण्याचे काम खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

जिल्हयातील नागरीकांच्या प्रशासनाकडील तक्रारीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन ऑगस्ट महिन्यात जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आले होते. या आढावा बैठकी दरम्यान भुम(159 तक्रारी), परांडा (67 तक्रारी), तुळजापुर (99 तक्रारी), उमरगा (151 तक्रारी), लोहारा (97 तक्रारी), वाशी (82 तक्रारी), कळंब (48 तक्रारी) तसेच आज फेर आढावा बैठकामध्ये (250 तक्रारी)  एकुण 953 प्राप्त झालेल्या नागरीकांच्या तक्रारीचा फेर आढावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैन्नक घोष यांच्यासह नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, धाराशिव येथे घेण्यात आली. प्रशासनाकडील विविध विभागाच्या विविध तक्रारी निराकरण, सर्व जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, विविध राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक तसेच महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनी व सर्व खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी व संबंधीत अधिकारी समवेत घेण्यात आली.

 
Top