परंडा (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी, परंडा तालुकाच्या वतीने नवीन भाजपा दिनदर्शिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब व जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, इंद्रजित देवकते, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, शहाजी पाटील व दिनदर्शिकेचे प्रकाशक बाबासाहेब जाधव तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.