धाराशिव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.त्याचबरोबर विवेकानंद जयंती सप्ताह चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

जयंतीचे औचित्य साधून डॉ.विकास सरनाईक यांनी सुधारणावादी विचार प्रवाह राजमाता जिजाऊ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.तर डॉ.मंगेश भोसले यांनी मला समजलेले विवेकानंद या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.केशव क्षीरसागर तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले.  यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा डॉ. सावता फुलसागर ,सह समन्वयक डॉ.संदीप देशमुख ,कनिष्ठ विभागाचे उपप्रचार्य श्री बी. एस. सूर्यवंशी आदींसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top