तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिरात व्हिआयपी पासचा होत असलेला गैरव्यवहार त्वरीत थांबवून भाविकांची होणारी गैरसोय टाळण्याची मागणी आम आदमी पार्टीने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंदिरात व्हिआयपी पासचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. हे व्हीआयपी पासेस विकुन काही जण अर्थिक कमाई करीत आहेत ही  राजरोसपणे फसवणूक आहे. यामुळे मंदिर संस्थानची मोठी बदनामी होत आहे. भाविकांना नाहक त्रास होत आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त श्रद्धेने व आपला कुलाचार करण्यासाठी येत असतो. शासनाने तर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानात यात्रेच्या कालावधीत व्हिआयपी दर्शनास

बंदी घातलेली आहेत. असे असताना येथील गोरखधंदे त्वरीत बंद करून देविभक्तांना न्याय द्यावा. अन्यथा दि 24/1/2025 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वजा निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाअध्यक्ष मधुकर शेळके, शहराध्यक्ष किरण यादव यांनी दिले. याचा प्रति विभागीय आयुक्त सह अन्य संबधितांना सादर केल्या आहेत.


 
Top