परंडा (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातही शास्त्रीय संगीताचे मुळे रुजण्यास सुरुवात निमित्त कै रामराव फडतरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साकत( बु ) येथे संगीत मैफिलीचे आयोजन फडतरे बंधूंनी केले होते.
ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताची मैफिल करणे हे खूप आनंददाई उपक्रम आहे. फडतरे बंधू गेली तीन वर्षे ही मैफिल आयोजित करतात. मैफिलीची सुरुवात तबला, हार्मोनियम जुगलबंदीने झाली हार्मोनियम मधील राग चारुकेशी व तबल्यामधील ताल रूपक यांचा उत्कृष्ट मिलाप करून अनेक वेगवेगळ्या लय व तानाचे प्रकार अप्रतिम होते. अतिदृथ झाला मध्ये तबला पखवाज व हार्मोनियम ने रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले. तबला हनुमंत फडतरे, हार्मोनियम सुरेश फडतरे व समारोपाचे गायन कर्नाटक हुबळी येथील पं कृष्णेंद्र वाडीकर यांनी सुंदर राग जोग,मारूबिहाग, आलाप तानाचे प्रकार गावकरी एकूण खुश झाले. तदनंतर अभंग सादर केले रसिकांच्या आग्रहास्तव कानोबा तुझी घोंगडी हा अभंग पण सादर केला. पंचक्रोशीतील लोकांना खूप आनंद घेतला भूम -परंडा- पाथरूड-बार्शी या गावातील रसिक उपस्थित होते.