धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 13 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान पहिल्या जागतिक विश्वचषक खो -खो स्पर्धेचा थरार दिल्ली येथे रंगणार असून यासाठी आज दिल्ली येथे भारतीय पुरुष व महिला खो -खो संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये धाराशिव जिल्ह्याची सुवर्णकन्या कु . अश्विनी शिंदे हिची अभिमानास्पद निवड झाली असून अश्विनी ही श्रीपतराव भोसले हायस्कूलची विद्यार्थिनी असून ती सध्या बारावी कला शाखेत शिकत असून, या तिच्या निवडीबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तसेच पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, श्रीमती बी. बी. गुंड , राजेंद्र जाधव ,निखिलकुमार गोरे, धनंजय देशमुख आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निवडी बद्दल अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.