धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या फिजिक्स वाला यांचे क्लासेस ऑफलाइन मोड मध्ये नीट व जे ई ई क्लासेस तसेच आठवी नववी दहावी साठी फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी देशमुख साहेबराव, प्राचार्य एन. आर. ननवरे, प्राचार्य घारगे संतोष, एम. व्ही. शिंदे, अरविंद भगत, दीपक पुजारी, संतोष कुलकर्णी, फिजिक्स वाला क्लासेस पुणे येथील चव्हाण व अल्पेश उपस्थित होते.
पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना प्रा. चव्हाण सर व प्रा. अल्पेश सर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुणे, लातूर, कोटा आदी ठिकाणी जावून आर्थिक व मानसिक त्रास करून घेण्याची गरज नाही. देशातील नामांकित फिजिक्सवाला ऑफलाईन क्लासेस कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या क्लासेसमध्ये फिजिक्सवाला यांचे स्टटी मटेरिअल. त्याचप्रमाणे देशपातळीवरील प्रश्नपत्रिका याद्वारे सरावा परिक्षा घेण्यात येतील. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाते नीट व जेईई क्लासेस तसेच इयत्ता आठवी, नववी, दहावीसाठी फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या पत्रकार परिषदेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.