परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील बी एस्सी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा शिवाजी लिमकर हिने कळंब येथे कै.सुमनबाई मोहेकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला तिला तीन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.कु.प्रतीक्षा लिमकर हिने वक्तृत्व स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटविल्यामुळे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते. . यावेळी स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, डॉ.अतुल हुंबे ,डॉ. अक्षय घुमरे,डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ.विद्याधर नलवडे ,डॉ.
प्रकाश सरवदे,डॉ. सचिन चव्हाण, डॉ.अमर गोरे पाटील, डॉ सचिन साबळे, प्रा. संभाजी धनवे व प्रा. रणजीत वरपे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून दिले जातील परंतु विद्यार्थ्यांनी नियमितपणे उपस्थित राहावे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे .महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशीलआहेतविद्यार्थ्यांनी त्यांच्या भवितव्यासाठी सकारात्मक विचार करून विद्या प्राप्त करावी असे म्हटले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सांस्कृतीक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रणजीत वरपे यांनी केले तर आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.