नळदुर्ग  (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार (दि.२८) रोजी अत्यंत उत्साहात पार पडले. निवृत्त शिक्षक महयोद्दीन सय्यद, केंद्रप्रमुख सत्तेश्वर जाधव यांच्या उपस्थितीत नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. पहिली ते पाचवीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मराठी व हिंदी गीतावर बहारदार नृत्य सादर केले तसेच पारंपारिक लेझीम कलाही सादर केली.

मुख्याध्यापक भास्कर मस्के, बिलाल सौदागर, सुंदर भालकाटे, वंदना चौधरी, सुरेखा मोरे, जयश्री धुमाळ, प्रीती भंडारे, राहुल खोडके,

अध्यापक विद्यालयातील महेश राठोड, आकाश पाटील, अभय चव्हाण, आदित्य चव्हाण, अमर बगले, वैष्णवी चंदे, सानिका मुळे, स्वाती पवार, अंजली चव्हाण, पायल जाधव, वैशाली शिरसागर यांच्यासह शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे संजय डुकरे सह इतर सदस्यांनी स्नेहसंमेलन पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. शाळेत मोठ्या संख्येने पालकांनी स्नेहसंमेलन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 

 
Top