धाराशिव (प्रतिनिधी) - येथील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी नितीन मगर यांची तर ग्रामीण अध्यक्षपदी अनिकेत कोंढारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, या समितीच्यावतीने महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व छत्रपती शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव येथील भवानी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी भवानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लिंबराज डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व छत्रपती शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरित कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये समितीच्या उपाध्यक्षपदी दीपक काळे, तेजस भोरे व शुभम शिंदे यांची तर सचिवपदी रोहन धोत्रे व ओंकार गुळवे यांची तसेच सहसचिवपदी विजय येरकळ व विष्णू डोलारे यांची तर कार्याध्यक्षपदी पृथ्वीराज मोटे व राम निचळ यांची तसेच सह कार्याध्यक्षपदी निखिल ढगे व बालाजी गडदे यांची तसेच कोषाध्यक्षपदी निलेश कांबळे व समाधान हराळे यांची तर संघटकपदी अभिजित धर्मे व रियाज तांबोळी यांची तसेच सहसंघटकपदी अजय माने, शरद शिंदे व अजय विधाते यांची तर सोशल मीडिया प्रमुखपदी शुभम कांबळे व नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन जयंतीचे माजी अध्यक्ष ऍड प्रवीण उर्फ शंकर शेटे यांनी केले.
या बैठकीस सदानंद अकोस्कर, विकी अंधारे, शरद स्वामी, विजय कोळी, सचिन खटके, सुरज जावळे, सचिन राठोड, आकाश जाधव, आकाश बिडवे, सोनू जावळे, नितीन चांदणे, फंटू काशीद, अक्षय टापरे, दत्ता माने, नरेश लेनेकर, अभि भोसले, निलेश टापरे, सोनू घुले, महेश चौगुले, बाळ मुंडे, बबलू तांबोळी, समाधान पडळकर, विशाल गाढवे, रोहन गाढवे, शुभम नरटे, गिरीश बोचरे, अमोल गौड, अजय तेरकर, कृष्णा डोलारे, किशोर डुकरे, रोहित राठोड, ओंकार दस आदी उपस्थित होते.