धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासोबत विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान मिळावे म्हणून आनंद मेळाव्याचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते.
या आनंद मेळ्याचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थासदस्य डॉ. मंजुळाताई आदित्य पाटील, संतोष कुलकर्णी, युवा उद्योजक अभिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या आनंद मेळाव्यात इ. 5 वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 500 स्टॉल लावून विविध प्रकारच्या खादय पदार्थांची मेजवाणी खवय्यांना त्यानिमित्ताने उपलब्ध करून दिली होती. प्रशालेतील सात हजार विद्यार्थ्यां बरोबर पालकांनी या खादय पदार्थांचा आस्वाद घेतला .आयोजकांनी संध्याकाळी पाचवाजेपर्यंत या आनंदमेळाव्याची उलाढाल जवळपास पाच लाखापर्यंत झाली, असे सांगितले. यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष स्वरूपात देण्याचा मानस असल्याचे मुख्य संयोजक तथा उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, श्रीमती बी. बी. गुंड,धनंजय देशमुख,निखिलकुमार गोरे, प्रा. मोहनराव शिंदे, प्रा. विनोद आंबेवाडीकर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.