वाशी (प्रतिनिधी)- वाशीला  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्राचीन दर्गाह तसेच हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले सय्यद शहाअब्दाल रहे यांचा वाशी शहरात दरवर्षी ऊरुस भरवला जातो. या उरुसानिमीत्त गुरुवारी शहरातील मेन दर्गा मध्ये देशमुख घराण्यातील गुलाबराव देशमुख व काझी बिरादरीतील सर्व सदस्यांच्या डोक्यावर संदल देवून संदलला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. यावेळी संदल मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री उशीरापर्यंत ही संदल मिरवणूक सुरु होती. वाशी येथील वर्तक चौक मेन दर्गा पासून वाणी गल्ली, जुने बसस्थानक, नाईकवाडी गल्ली ते मेन दर्गा या मार्गावरून मिरवणूक दर्गा येथे पोहोचली.

 दर्गा मध्ये उरुस कमेटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच दर्ग्याचा गिलाफ वंश परंपरेने स्वच्छ करणारे सोमनाथ परीट यांचाही सत्कार करण्यात आला.या नंतर फातेहा खाणी होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले. ही संदल मिरवणूक बँड बाजा, डीजे मुक्त आणि धार्मिक विधी पार पाडून शांतेत साजरा करण्यात आली. यावेळी वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, सूर्यकांत सांडसे, बळवंत कवडे, शिवशंकर चौधरी, गणेश कवडे, विशाल महामुनी, बाळासाहेब शेरकर, शिवाजी उंदरे, किशोर माने, अवधूत यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमेटीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.


 
Top