धाराशिव (प्रतिनिधी) - येथील मोहन नामदेवराव राऊत (वय ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दि.९ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी सूर्यकांत आणि कंपनी या पेट्रोल पंपावर कॅशियर म्हणून काम केले होते. ते धाराशिव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील डी.एम.राऊत यांचे वडील होते.