तुळजापूर (प्रतिनिधी) - तहसील कार्यालयातुन निर्गत झाल्याचे भासवणारे बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची व तहसील कार्यालय तुळजापूर यांची फसवणुक केल्या प्रकरणी औरंगाबाद व पुणे येथील दोघांजणां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी, वय 54 वर्षे, रा. हरिचरण अपार्टमेंट, शाहानुरवाडी, क्रांतीचौक औरंगाबाद, सतिश सोपानराव येरणाळे, वय 58 वर्षे, रा. फ्लॅट नं 302, माउली अपार्टमेंट, सुतारवाडी पाशान पुणे यांनी दि.09.12.2024 रोजी 11.00 वा. सु. तुळजापूर तहसील कार्यालय तुळजापूर या कार्यालयातुन निर्गत झाल्याचे भासवणारे बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची वतहसील कार्यालय तुळजापूर यांची फसवणुक केली आहे. अशा फिर्यादी तहसिलदर शंकरराव बोळंगे, यांनी दि.16.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 338, 336(4), 340(2), 341(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top