धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय दिवंगत विधीज्ञ धाराशिव बॅडमिंटन स्पर्धा रविवारी दिनांक 12 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा स्टेडियम बॅडमिंटन हॉलमध्ये पवन इंगळे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून घेण्यात आल्या.

स्पर्धेमध्ये न्यायाधीश, महिला विधीज्ञ, पुरुष विधीज्ञ यांनी सहभाग घेऊन या झालेल्या स्पर्धेमध्ये महिला एकेरी या गटांमध्ये . ज्योती भोसले मॅडम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक ऍड भाग्यश्री कदम मॅडम यांनी मिळविला. महिला दुहेरी गटामधून ज्योती भोसले आणि भाग्यश्री कदम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक कल्पना निपाणीकर आणि तेजस्विनी पाटील यांनी मिळविला. पुरुष एकेरी या गटामध्ये निलेश बारखडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक अक्षय जाधव तुळजापूर यांनी मिळविला. पुरुष दुहेरी गटामध्ये प्रथम क्रमांक प्रसाद जोशी, ॲड निलेश बारखडे यांनी मिळविला. तर द्वितीय क्रमांक गणेश सुकाळे वाशी व राजाराम चौरे यांनी मिळविला.

या स्पर्धेमध्ये भाग घेऊन खेळाची शोभा वाढविली त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनस्वी आभार आणि विजेत्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संयोजक ॲड. निलेश बारखडे, ॲड. नितीन भोसले, अध्यक्ष ॲड.प्रसाद जोशी, उपाध्यक्ष ॲड. किरण चादरे व सर्व पदाधिकारी जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव यांनी केले. बक्षीस वितरण दिनांक 22/1/ 2025 रोजी संध्याकाळी स्नेहसंमेलनामध्ये नगरपरिषद नाट्यगृह मध्ये होणार आहे.


 
Top