तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तुळजापूर येथे कार्यरत असलेला कंत्राटी लिपिक कम डाटा इंन्ट्री आँपरेटर अतुल शहाजी देशमुख (वय 37) याला 300 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार दि. 29 जानेवारी रोजी  रंगेहात पकडले.

याबाबतीत अधिक माहीती अशी कि, एका 65 वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलाच्या नावाने शेतात तुती रेशीम लागवडीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल केला होता. प्रशासनाने 6/08/ 2024 रोजी या प्रकल्पासाठी 4 लाख 18 हजार 815 रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सदर शेतामध्ये  तक्रारदाराने शेतात लागवड करून पाच मस्टर भरुन संबंधित कार्यालयात जमा केले. यापैकी चार मस्टरचे 27,621 रुपयांचे बील मंजूर झाले. परंतु त्यांना अद्याप पैसे मिळाले नव्हते. बुधवारी नमुना क्रमांक 04 अंतर्गत मागील आठवड्याचे मनरेगा ऑनलाईन ई-मस्टर काढण्यासाठी यातील इलोसे याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आरोपी लिपिक अतुल देशमुख याने पंचासमक्ष 300 रुपयांची लाच मागितली. सदरची लाच रक्कम सापळा कारवाई दरम्यान स्वता स्विकारली असताना ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सापळा कारवाईत पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, शशिकांत हजारे यांनी कारवाई केली.

 
Top