धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 4,25,047 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. यंदाच्या हंगामात 1,708 किलो प्रति हेक्टर उत्पादन मिळून एकूण 72,598 मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन झाले आहे. शासनाने जिल्ह्यासाठी 14,41,988 क्विंटल सोयाबीन खरेदीचा लक्षांक दिला होता.

सोयाबीन खरेदीचा वेग मंद असुन सध्या जिल्ह्यात केवळ 2,30,542 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, अजूनही 12,11,446 क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी आहे. आतापर्यंत 35,403 शेतकऱ्यांनी हमीभावासाठी नोंदणी केली आहे. मात्र केवळ 8,837 शेतकऱ्यांकडीलच सोयाबीन खरेदी झाली आहे. अजूनही 26,566 शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची उर्वरित सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी व कृषी संघटनांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी केली असली, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात खरेदी बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित,मुंबई. यांच्या कडे केली आहे.

 
Top