तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचे उपाध्य तथा सेवानिवृत्त कोषागार अधिकारी श्रीकृष्ण गंगाधर दिक्षीत (81)व त्यांच्या सौभाग्यवती पुष्पा श्रीकृष्ण दिक्षीत( 75)यांचा  सहस्त्रचंद्रदर्शन शांती व तीर्थरूप सौ. पुष्पा श्रीकृष्ण दीक्षित यांची विजयरथ शांती व उभयतांचा तुलाभार सोहळा पौष कृष्ण त्रयोदशी, सोमवार 27 रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या पावन भूमित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 दिक्षीत परिवार पुर्वी मंदीरात वास्तव्यास होते त्यांच्या घरी अखंड  आग्निहोञी चालु असे या दाम्पत्यांना तीन कन्याच असल्याने या तिन्ही कन्यांनी एकञित येवुन  आपल्या तीर्थरुप सहस्ञचंद्रर्शन शांती व विजथरथ शांती करुन तुलाभार करुन आईबाबा प्रती आपले प्रेम व्यक्त केले. या सोहळ्या नंतर आप्तेष्ट व परिवार यांना स्नेह भोजनाने या आर्दशवत सोहळ्याचा उत्साहात सांगता झाला. या सोहळ्यासाठी त्यांचे मुला समान जावाई श्रलक्ष्मीकांत अच्युतराव आचार्य - शरयू लक्ष्मीकांत आचार्य. रा तेर, अमरनाथ अनंतराव राजूरकर - मृणाल अमरनाथ राजूरकर.रा नांदेड , समीर सुरेशराव देशपांडे - रोहिणी समीर देशपांडे.  रा केज यांनी परिश्रम घेतले.महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत हा प्रथमच मुलींन कडुन आपल्या जन्मदात्यांचा 75वर्ष पुर्ती  निमित्ताने  सहस्ञचंद्र दर्शन सोहळा घडवुन  आपल्या माता पित्याचा सन्मान केला.

 
Top