धाराशिव (प्रतिनिधी)-  गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण शाश्वत विकासासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. गोविंद कोकणे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर  राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या गावातील विविध ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. तसेच सकाळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. दुपारच्या सत्रामध्ये बालविवाह प्रतिबंध या विषयावर प्रा. डॉ. जी. डी. कोकणे, इंग्रजी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉ. गोविंद कोकणे यांनी जनजागृती, उच्च शिक्षण आणि कायदयाची अंमलबजावणी या माध्यमातुन बालविवाह हि अनिष्ट प्रथा, परंपरा पुर्णपणे बंद करता येईल, असे प्रतिपादन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक विकास शाश्वत विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत. जगात बालविवाह आयोजित करण्यात भारताचा तिसरा नंबर आहे. 

बालविवाहामुळे बालकांचे नैसर्गिक हक्क हिरावून घेतले जातात. सुजाण, जबाबदार नागरिक बनण्या अगोदर संसाराची जबाबदारी दिल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. उच्च शिक्षणाच्या अभावाने त्यांना आशा, आकांक्षा पुर्ण करण्यात अडथळे येतात. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, नैतिक, राजकीय विकासासाठी उच्च शिक्षणाची भूमिका निर्णायक आहे. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल खोब्रागडे व्यासपीठावर उपस्थिती होते. त्यांनी आंतरविद्याशाखीय व बहुविदयाशाखीय शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले. तर वैभव भोरे यांनी आभार मानले. सायंकाळच्या सत्राला गावातील महिलालांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.  सदरील कार्यक्रमाचे नियोजन हे शिबिरार्थी विद्यार्थिनी  तसेच नीता मारकल, पूर्णिमा गुंड, कविता चव्हाण, निकिता माळी व मेघा काळे यांनी केले.

 
Top