कळंब (प्रतिनिधी) -कला व वाणिज्य महिला  महाविद्यालय देवपूर धुळे आणि मराठी साहित्य मंडळ, ठाणे या प्रख्यात संस्थेच्या वतीने संयुक्त रित्या देवपूर धुळे शहरातील महिला महाविद्यालयात रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या  संमेलनाचे उद्घाटन दादासाहेब अनिल भाईदास पाटील ( मा.मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार अमळनेर विधानसभा) यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे  अध्यक्ष स्थान नगाव येथील जेष्ठ लेखक - समाज सेवक नानासाहेब  शशिकांत तुकाराम भदाणे हे भूषविणार असुन सातारा कोरेगाव येथील ज्येष्ठ लेखक अँड.पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे हे मावळते संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने संमेलनाचे अध्यक्ष भदाणे यांना पुढील सुत्रे सोपविणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा स्मिता अतुल अजमेरा या उपस्थित राहणार आहेत. धुळे लोकसभा खासदार डॉ. शोभाताई बच्छाव तसेच धुळे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मेघा विलास कमेरकर ,(उपाध्यक्ष वेस्ट खान्देश भगिनी मंडळ,धुळे) नासिक येथील जेष्ठ कवियत्री लतिका गवांदे तसेच कराड ज्येष्ठ कवी तथा माजी संमेलनाध्यक्ष  सुरेश लोहार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार .

तसेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.झेड. चौधरी, नाशिक येथील डि.एस.पी, सर्वधर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जी.के.गोपाळ, अँड अम्रिता अतुल अजमेरा (सचिव,वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ, धुळे) तसेच पुणे येधील माजी संमेलनाध्यक्ष मा.डॉ. विनायकराव जाधव आदि मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कुलकर्णी, जळगांव जिल्हाध्यक्ष बापूसाहेब आनंदराव पाटील (ठाकरे), तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष  योगेश रोकडे मराठी साहित्य मंडळ मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून सोलापूर येथील जेष्ठ लेखिका मा.डॉ.रजनी दळवी या परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत .नागपूर येथील मा. डॉ.प्रवीण अंपलेचवार तसेच धुळे येथील डॉ. पापालाल पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्ष अलिबाग रायगड जिल्हाध्यक्ष जेष्ठ कवी मा. राजेश थळकर हे कवी संमेलनाचे अध्यक्षपद बसवणार असून धुळे येथील ज्येष्ठ कवियत्री मा. मंगला राजपूत तसेच कोल्हापुरातील जेष्ठ कवियत्री सुनंदा बागडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कवी संमेलनामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी धुळे येथील डॉ. ममता काशिनाथ भराडे - सोनवणे आणि प्रवीण शंकरा थोराते परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याच संमेलनामध्ये जीवन गौरव पुरस्कार साठी राज्यातून एका व्यक्तीची निवड केली जाते हा सर्वात मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई जीवन गौरव पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव  गावातील ज्येष्ठ साहित्यिक माननीय देविदास रामभाऊ बांगर यांना उपस्थित मान्यवरांच्या असे प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कारासाठी मालेगाव रोड धुळे येथील सौ. आशा प्रकाश पाटील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बामखेडा गावातील सुहास रमेशचंद्र चौधरी यांना समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कारासाठी खालील लेखकांची निवड झाली आहे. धायरी पुणे येथील मोगल सीताराम जाधव यांच्या फलश्रुती या आत्मचरित्राला तसेच शिरपूर येथील बाळू विठोबा श्रीराम यांच्या 'आहे करार बहुदा' या गजल संग्रहाला तर देवपूर धुळे येथील संजय धनगव्हाण यांच्या 'सुखलेल्या मातीच गर्हाण' या कवितेसंग्रहाला आणि चाळीसगाव रोड धुळे येथील राजेश गोरक्षनाथ यांच्या 'चांदोबाचा दिवा'या बालकविता संग्रहाला तसेच धुळे येथील अँड. सुरेश रघुनाथ सोनवणे यांच्या 'स्मृतिगंध' या पुस्तकाला तसेच श्रीमती सुनंदा शोभा निकम ,जमनागिरी रोड धुळे येथील कैसेन( योद्धा) आत्मचरित्रपर चरित्राला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरणास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र ,ग्रंथ भेट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे असे धुळे जिल्हाध्यक्ष श्रीमती सुनंदा शोभा निकम यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ममता सोनवणे आणि प्रवीण थोरात हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. या संमेलनाचे राजेश सोनार मुख्य संयोजक असून, संजय धनगव्हाळ, दत्तात्रय कल्याणकर ,राम जाधव, मुरलीधर पांडे, सुनील बोरसे, आणि प्रवीण सर हे संयोजन समितीचे सदस्य आहेत या संपूर्ण साहित्य संमेलनाचे संचालन महिला महाविद्यालय  मराठी विभाग प्रमुख सुप्रसिद्ध निवेदक श्री विनोद वासुदेव अपर्वटहे करणार आहेत .        

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळून निघणाऱ्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील या करणारा असून संमेलनाअध्यक्ष शशिकांत भदाणे, प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी,प्रा संजय सोनावणे प्रा.डॉक्टर दगडू वाघ ,डॉ. राजेश मगनलाल शहा आदी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी ग्रंथ दिंडी, संमेलनास्थळी पोहोचल्या नंतर सर्व मान्यवरांनी तसेच पुरस्कार प्राप्त सभासदांनी ,निमंत्रित कवींनी, नवोदित कवींनी, परिवारासह संमेलन स्थळी दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती आयोजन समितीच्या सदस्यांनी पत्रकात केली आहे.

 
Top