धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या चीनमध्ये एच.पी.एम.वाय विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना काय करावे आणि काय करू नये याबाबत आवाहनही करण्यात आले आहे.

मानवी मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीटी ) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे.ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी.दिल्ली यांनी 3 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.  वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. चीनमधून आलेल्या नवीन विषाणू  एचएमपीव्ही बाबत चिंतेचे कारण नाही, परंतु काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एल.हरिदास यांनी केले आहे.


हे करा 

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका .साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल याची दक्षता घ्या. 


हे करू नये   

हस्तांदोलन,टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर,आजारी लोकांशी जवळचा संपर्क,डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.  

 
Top