धाराशिव(प्रतिनिधी) -डेहराडून उत्तराखंड येथे होत असलेल्या 38 व्या नॅशनल गेम्स साठी धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे यांचे धनुर्विद्या क्रीडा प्रकारातून महाराष्ट्राचे टीम मॅनेजर म्हणून निवड झाली आहे.
नॅशनल गेम्स मध्ये २० धनुर्धर, ४ टीम कोच आणि १ टीम मॅनेजर असे एकूण 25 जणांचा जम्मू सहभागी होणार असून १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा होणार आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या वतीने 12 ते 28 जानेवारी दरम्यान सदरील खेळाडूंचा कॅम्प घेण्यात आला असून बुधवारी संघ उत्तराखंड रवाना झाला आहे.
दरम्यान प्रवीण गडदे यांचा धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी धाराशिव जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश गडदे, कार्याध्यक्ष अतुल अजमेरा, सहसचिव अभय वाघोलीकर, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, सदस्य डॉ. श्रीकांत कवठेकर अनिल जमादार, सुधीर बंडगर, नितीन जामगे, प्रतापसिंह राठोड, कैलास लांडगे, यशोदीप कदम यांच्यासह खेळाडू पालक यांचे उपस्थिती होती