मुरुम (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद उर्फ भगत माळी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सात सायकलीचे वाटप करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. 24) रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिकत असलेल्या ग्रामीण भागातून दररोज ये-जा करणाऱ्या होतकरू व गरीब विद्यार्थिनींना सात सायकलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

शाळेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून भगत माळी यांनी स्वखर्चाने सायकली देत असल्याचे भगत माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे म्हणाल्या की, भगत माळी यांनी आमच्या प्रशालेला सात सायकली दिल्याचे कौतुक, समाधान व आभार व्यक्त केले. संदीप बाबळसुरे, वैभव इंगळे, प्रतिक राठोड, विठ्ठल चौधरी, प्रशांत राठोड, सोनाली कलशेट्टी, स्वप्नील पाटील, शेके गुरुजी, अलका गायकवाड, विजय महामुनी, सचिन राठोड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना जाधव तर आभार सोनाली कलशेट्टी यांनी मानले. शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.                

 
Top