धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा दुसरा दिवस. शिबिरातील विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रा मध्ये गावातील मुख्य चौकामध्ये स्वच्छता केली. दुपारच्या सत्रामध्ये शिबिरार्थी साठी “आजचा युवक व वाचन“ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
या सत्रामध्ये डॉ. एम. जी. कळलावे हे प्रमुख वक्ते तर डॉ. एम. डी. असोरे ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. डॉ. कळलावे यांनी आपल्या मार्गदर्शनातं विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विषद केले. ते आपल्या मनोगता मध्ये म्हणाले कि, वाचनाने माणसाचा सामाजिक, मानसिक तसेच बौद्धिक विकास होतो. अध्यक्षीय समारोपा मध्ये डॉ. एम. डी. असोरे यांनी आपल्या मार्गदर्शनातं वाचनाचे फायदे विषद केले. तसेच काही नामांकित लेखकांच्या साहित्याचा उल्लेख करून, त्यांचे आपल्या आयुष्याशी निगडित फायदे विषद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी गुलशन सरवदे यांनी केले तर आभार सुमित शिंदे यांनी व्यक्त केले. तिसऱ्या सत्रामध्ये रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या मदतीने महिला व मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विशाल अवधूत (एमकुअर फार्मा, पुणे) व निर्दोष गोसावी (लाईफ केअर फार्मा, मुंबई ) यांनी हिमोग्लोबिन तपासणीचे कार्य पार पाडले. याप्रसंगी एकूण 116 महिला व मुलींची यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना हिमोग्लोबिन संबंधित माहिती पत्रक देण्यात आले.