धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कार्यरत असलेल्या ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची पद भरतीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झालेली आहे व नियुक्ती नंतर झाली आहे. अशा सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकारच्या धरतीवरती जुनी पेन्शनचे विकल्प प्रस्ताव मागण्यात आले आहेत. ते आपल्या स्तरावरून तात्काळ निकाली निघावेत. अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.
तसेच आंतरजिल्हा बदलीने .जे शिक्षक कर्मचारी आहेत त्या शिक्षकांचे त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेस संबंधित शिक्षकाचे जुनी पेन्शन विकल्प प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवावेत. तसेच संबंधित जिल्हा परिषद ला पडताळणी पत्र पाठवून जुनी पेन्शन विकल्प सादर केलेले प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष श्रलालासाहेब मगर, राज्य नेते बशीर भाई तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस श्रअविनाश मोकाशे, संघटना प्रतिनिधी महेंद्र रणदिवे, जिल्हा प्रतिनिधी विलास तानले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.