नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी आपल्या प्रशासकीय कालावधी मध्ये शहराच्या विकासासाठी सुमारे साडे चार कोटी रुपयाचे विकास कामे करुन शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान ही कामे करीत असताना शहरातील अडचणी सोडवत सर्वांना विश्वासात घेवून ही कामे केल्यामुळे आज शहरात अनेक भागात विकासाची कामे झाल्याचे दिसून येत आहे. तर कांही विकास कामे अजून ही प्रगतीपथावर आहेत.
नळदुर्ग पालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय कालावधी आहे. या प्रशासकीय कालावधी मध्ये मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी शहरात भरीव विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या पालिकेच्या विविध फंडातून सुमारे साडे चार कोटी रुपयेचे कामे शहरात त्यांनी घेतले असून यामध्ये 32 विकास कामे त्यांनी घेतली आहेत. या 32 कामा मध्ये सुमारे 23 कामे पूर्ण झाले असून तीन कामे कांही आडचणीमुळे ती आदयाप चालूच झालेली नाहीत तर सात कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2023 24 मध्ये एकूण 33 कामांना मंजूरी मिळाली असून यामध्ये आठ कामे पूर्ण झाली असून आठ कामे प्रगतीपथावर आहेत. तर तेरा कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत. या कामावर ही सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी रुपये खर्चाची कामे पुर्ण झाले आहेत. तर सन 2024 -25 चालू वर्षात ही समारे पाच कोटी रुपयेची कामे मंजूर झाली आहेत. या कामाची निवीदा प्रक्रीया ही लवकरच पूर्ण होईल आणि या कामास ही लवकर सुरुवात होईल. दरम्यान त्यांनी या केलेल्या विकास कामाध्ये रस्ते कांक्रीटीकरण, नाली बांधकाम, उदयान विकसीत करणे, मंदीराला संरक्षक भिंत बांधणे, सभागृह बांधकाम करणे, सभामंडप बांधकाम करणे, त्याच बरोबर सार्वजनिक स्वच्छता गृह बांधकाम करणे आदी कामाचा समावेश आहे, शहरातील सर्वच जामी धर्माच्या प्रमुखांना विश्वासात घेवून सर्वांचीच विकास कामे करण्याचा प्रयत्न श्री कुंभार यांनी केला आहे.
त्याच बरोबर शहरवाशीयांचा आजपर्यंतचा जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा, सध्या शहराला धरण उशाला आणि कोरड घशारा अशी आवस्था झाली आहे. गेल्या चार पाच वर्षापासून शहरा वाशीयांना आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे, धरणात मुबलक पाणी साठा आसताना ही शहरावाशीयांची पाण्यासाठी होरपळ होत असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कालावधी मध्ये सर्वात महत्वाचे काम पाणी पुरवठयाचे केले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहराला पूढील तीस वर्ष पाणी समस्या जाणवू नये असा पाणी पुरवठा योजनेचा बीनचुक आणि योग्य रित्या पालिकेकडून प्रस्ताव तयार करुन शासनास पाठविला आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासाठी पुढाकार घेवून सुमारे 46 कोटी रुपयेची शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली. आज शहरात या पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली असून शहरातील वाढीव नगरामध्ये या पाणीपुरवठयाच्या योजनेच्या जलवाहीन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अनेक ठिकाणी जलकुंभ बांधकामाची कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे कुंभार यांनी आपल्या प्रशासकीय कालावधीमध्ये शहराच्या विकासासाठी जी कामे केली आहेत ती कौतुकास्पद असल्याचे शहरावासियांतून बोलले जात आहे.