तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात पुनश्च मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासियांन सह भाविकांन मधुन केली जात आहे,
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात जनावरे मालक आपले जनावरे शहरात दिवसा सोडून देतात हे जनावरे मंदीर महाध्दार सह मुख्य रस्त्यावर खाण्याचा शोधात फिरतात खायला नाही मिळाले कि दुकानदारांचे चुरमुरे पुढे खाण्यासाठी येताच दुकानदार त्यांना त्या पासुन रोखताच ते दुकान परिसरात वावरणा-या भाविकांच्या अंगावर जातात वेळेप्रसंगी ! त्यांच्या हातातील फळे चुरमुरे पुढे खाण्याचा वस्तुस तोंड लावुन खाण्याचा प्रयत्न करतात या घटनेत अनेक भाविक जखमी झाले आहेत.
श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञ महोत्सव काळात मोकाट जनावारांचा बंदोबस्त करण्यासाठी टेंडर काढले होते याकाळात ५९ मोकाट जनावरे पकडुन ते गोशाळेत दाखल केले माञ नवराञोत्सव संपताच मोकाट जनावरे मालकांनी मोकाट जनावरेपकडण्यास विरोध केला वेळी प्रसंगी त्याचावर दाबदडप करण्याचा प्रयत्न केल्याने यास कंटाळुन त्यांना मोकाट जनावरे बंदोबस्त ठेका सोडून दिला
आता पुनश्च मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असुन याचा बंदोबस्त करण्यास कुणीही धजावत नाही
या पार्श्वभूमीवर ज्या मोकाट जनावराने भाविक शहरवासियांन वर हल्ला केला त्या जनावराचा मालकावर पोलिस कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा -यादवमोकाट जनावरे मंदीर सह शहरातील ! मुख्य रस्त्यावर मोकाट फिरुत असुन त्याचा ञास भाविकांना सहनकरावा लागत आहे तुळजापूर शहरातील मंदीर महाध्दार दीपक चौक येथे जनावराचा कळप भावीकाला त्रास सहन करावा लागत आहे तरी भाविक सुरक्षेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष किरण यादव यांनी केली