तुळजापूर (प्रतिनिधी)- मातंग समाजाचे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातून तसेच तुळजापूर तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मध्ये भारत स्वातंत्र्याच्य इतिहासामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम अमित गोरखे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे गट नेता मां. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आल. अमित जी गोरखे हे मातंग समाजाचे असल्यामुळे 2024 मध्ये झालेल्या विधानसभेमध्ये बहुजन सवांद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये भाजपाला जास्तीत जास्त मतदान समाजाच्य वतीने करण्यात यावं यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये बहुजन संवाद यात्रा आयोजित केली होती.ही यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडली.

महाराष्ट्र राज्याच्या भाजपाने दिलेल्या संधीचं सोनं करत असताना मातंग समाजाने जास्तीत जास्त भाजपाला या विधानसभेमध्ये मतदान केलं आज या महाराष्ट्र विधान सभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एकतर्फी सत्तेमध्ये बसण्याचा जनतेने कौल दिला. भारतीय जनता पार्टी आणि अमित गोरखे यांच नेतृत्व व त्यांचं कौशल्य बघून त्यांना विधान परिषदेवरती काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर डॉक्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या धरतीवरती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संशोधन समितीची गठीत केली तसेच मातंग समाजाची अस्मिता असलेला वस्ताद लहुजी साळवे यांच्या संगमवाडी येथील स्मारकाचे काम तेवढ्याच ताकतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन या ठिकाणी मातंग समाजाला न्याय देण्याचे काम केलं, डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे घर मुंबई येथील चिराग नगर तसेच वाटेगाव येथील स्मारकासाठी भरिव निधीची तरतूद अमित गोरखे व भाजपा सरकार यांनी आपला व शासनाचा विचार  सामाजिक  ज्ञात करण्याचे काम केलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमितजी गोरखे यांनी महाराष्ट्रामध्ये बहुजन सवांद यात्राही यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांचा सन्मान करत तुळजापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर येथील जनतेने भरघोस अशा मतांनी विजयी केले. मांग , मातंग लोकसंख्या जास्त असलेल्या महाराष्ट्रामधील  मतदारसंघांमध्ये भाजपा,  शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या उमेदवाराला वाद वाढीव मतदान झाल्याचे समाधान आहे. जवळपास महाराष्ट्र मध्ये 125 उमेदवाराला वाढीव मतदान करून लिड देण्याचे काम महाराष्ट्र मधील मातंग समाजाने केले. त्यामुळे आम्ही अमितजी गोरखे यांना विकासभिमुख व लोकभिमुख व समाजनिष्ठ काम करण्याची संधी मंत्रीपदाच्या माध्यमातून देण्यात यावी. 

अशी मागणी संबंध धाराशिव जिल्ह्यातून तसेच तुळजापूर तालुक्यातील मातंग समाज बांधव करीत आहे. व ॲड.सुनील क्षीरसागर यांनी समाजाच्या वतीने केली आहे.

 
Top