तुळजापूर - श्रीतुळजाभवानी मातेचा  कुलधर्म कुलाचार करण्यासाठी  करण्यासाठी कर्नाटकातुन आलेल्या  भाविकाचे जादा आलेले  साडेतेरा हजार  रुपये  देविचे पुजारी उमेश अच्युतराव क्षिरसागर यांनी भाविकाच्या खात्यावर पाठवुन पैसे मिळाले कि नाही याची खात्री करुन घेतली. श्रीतुळजाभवानी  मंदीरात भाविकांची लुट केली जाते असा आरोप सातत्याने होतो आहे,. मात्र फसवणूक करणारे बोगस पुजारी असुन जे वंशपरंपरागत गेली अनेक पिढ्यापासून भाविकांचा कुलधर्मकुलाचार करणारे प्रामाणिक पुजारी असे प्रकार करीत नाहीत. हे या घडलेल्या घटनेवरुन दिसुन येते. 


कर्नाटक राज्यातील संतोषकुमार नारायण जिंदगी यांनी दि १९ डिसेंबर रोजी तुळजापूरला येऊन पुजारी उमेश क्षिरसागर यांच्याकडे येऊन देवीचा कुलधर्मकुलाचार  केला. नंतर या  भक्ताचे पंधरा हजार  रुपये  नजरचुकीने क्षिरसागर यांच्या बँक खात्यात आले होते, परंतु प्रामाणिकपणे उमेश यांनी त्या भक्ताची उर्वरीत रक्कम 13500 भक्तास परत दिले. या मुळे भक्तानी उमेश यांचे आभार मानले.

 
Top