तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  आरळी (बुद्रुक), येथील धनाजी धोतरकर यांची “जीनोम सेव्हिअर पुरस्कार 2023-24” पुरस्कार साठी निवड झाली आहे.

धनाजी धोतरकर हे  राबवत असलेल्या पारंपारिक बियाणांची जपवणूक व जैवविविधता संवर्धन यामध्ये आपण केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे कार्यान्वित “राष्ट्रीय कृषि विकास योजना - मॉडेल जीनोम क्लब“ प्रकल्प अंतर्गत आपल्याला “जीनोम सेव्हिअर पुरस्कार 2023-24 ” देऊन सन्मानित करण्यात येत आहे. :जीनोम सेव्हिअर पुरस्कार 2023-24 व 2024-25 वितरण सोहळा 24/12/2024 रोजी विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे सकाळी 11:00 वाजता  आयोजीत केला आहे.

 
Top