धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेतील पंधराशे विद्यार्थ्यांनी महावाचन अभियान राबवत मानवंदना देण्यात आली.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य बाळासाहेब मुंडे, उपप्राचार्य विक्रमसिंह देशमुख, सहशिक्षक एम. एस. कुंभार, प्रा. संभाजी भोसले यांचे हस्ते भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी प्रा. रवी सुरवसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन परिचयाची माहिती करून देत विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण अंगी करावे असे सांगितले. तर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत महावाचन अभियान प्रशालेमध्ये राबविण्यात आले.सदर महावाचन अभियानामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top