भूम (प्रतिनिधी)- ज्यांना आरक्षण लाभ घ्यावासा वाटतो त्यांनी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी समरस झालं पाहिजे अस मत अनेकांनी व्यक्त करत येथिल भाजप कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी प्रतिमेला वंदन केले .
शुक्रवार दि 6 डिसेंबर 2024 रोजी भाजप कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, भूम शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विधीज्ञ संजय शाळू, सुग्रीव शिंदे वाल्हा, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, शुभम खामकर, सुरेश उपरे , ब्रम्हदेव उपासे, अक्षय सोन्ने गोसावीवाडी, निलेश डोके डोकेवाडी यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.