तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे व ममता शिंगाडे यांनी सहकुटुंब नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 ला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांची संवाद साधला व विद्यार्थ्यांमध्ये विविध कलेविषयी आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोलापूर येथील छाया प्रकाशन फाउंडेशनच्या वतीने प्रेरणा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले असता आपण ज्या प्राथमिक शाळेत शिकलो त्या प्राथमिक शाळेला भेट देण्यासाठी शाळेत आलो असल्याचे सांगितले.
सिद्धार्थ शिंगाडे हे नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 चे माजी विद्यार्थी असून प्रेरणा पुरस्काराची एक लाख रुपयाची रक्कमे पैकी 25% रक्कम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी देणार असल्याचे सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र पाटील, सुज्ञानी गिराम, शिवाजी डाके सह चित्रकार ममता शिंगाडे, शिलीव शिंगाडे ,विजयमाला शहाजी शिंगाडे उपस्थित होते.