नळदुर्ग (प्रतिनिधी)- चंपाषष्टी निमीत्त येथील मैलारपूर श्री खंडोबा मंदीरात मोठया संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या पाच दिवसापूर्वी श्री खंडोबाचे आगमन नळदुर्ग मैलारपूर मंदीरात झाले आहे. आज चंपाषष्टी निमीत्त भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी श्री खंडोबाचे पावणे दोन महिने वास्तव्य आसणार आहे.

नळदुर्ग मध्ये श्री खंडोबाचे आगमन होताच शहर व परिसरातील ग्रामीण भागात भक्तांनी त्यांच्या घरी देवाचा घट घातला होता. आज चंपाषष्टी रोजी हा घट उठवून भाविक श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मैलारपूरात दाखल झाले होते. यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणांनी मंदीर परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच खंडोबा मंदीरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. दरम्यान उदया रविवार आसल्याने रविवारी ही या ठिकाणी सुमारे लाखावर भाविक दर्शनासाठी मैलारपूरात दाखल होतात.


 
Top