तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील लातुर रस्त्यावर असणाऱ्या नव्या बसस्थानकात 63 वर्षिय वृदाच्या पर्स मधील सोन्याचे 311 ग्रॅम वजनाचे दागिने किंमत 12 लाख 44 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवार दि.3 डिसेंबर रोजी घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील बसस्थानक हे चोरट्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनली आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी कि, जयश्री तुकाराम बनसोडे, वय 63 वर्षे, रा.महादेव गल्ली, कोरेगाव रोड उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव या दि. 03 डिसेंबर रोजी उमरगा येथे जाण्यासाठी नविन बसस्थानक तुळजापूर येथे आले असताना त्यांचे पर्समधील 311 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण किंमत 12 लाख 44 हजार किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशी फिर्यादी जयश्री बनसोडे यांनी दि.05 डिसेंबर 2024 रोजी दिल्यावरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.