धाराशिव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचा गाळप हंगाम सन 2024-25 यशस्वीपणे चालु आहे. गुरुवारी (दि.5) अखेर कारखान्याचे गाळप 52 हजार 100 मेट्रीक टन इतके झाले असुन 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गाळपास आलेल्या ऊस बिलाचे पेमेंट एफआरपी पोटी प्रती मेट्रीक टन 2,700 रूपये प्रमाणे सोमवारी (दि.9) ऊस पुरवठादार शेतकरी यांचे बँक खात्यात वर्ग होणार आहे. याची सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनानुसार शेतकयांच्या जिवनात आर्थीक उन्नती व्हावी व त्यांचा जिवनस्तर उंचावण्याचा सार्थ हेतु विचारात घेवुन कारखान्यामार्फत विविध ऊस विकास योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी हा केंद्रबिंदु समोर ठेवून या कारखान्याची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या भागातील शेतकरी यांचा ऊस मांजरा कारखान्यास देण्याचा कल आहे. मांजरा कारखान्याची वेळेवर ऊस दर शेतकयांना अदा करण्याची परंपरा कायम ठेवत या कारखान्याने याही हंगामात ऊस पुरवठादारांना प्रति मेट्रीक टन रु. 2,700 रूपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम सोमवारी बँकेत वर्ग करीत आहेत. त्यामुळे या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकयांनी मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी केले.


 
Top