उमरगा (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य, परभणी व मस्साजोग येथील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि 27) वंचित बहुजन आघाडी, सामाजिक संघटना व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार गोविंद येरमे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागास समाजावर अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत करावी. देशाची माफी मागावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते रामभाऊ गायकवाड, माजी समाजकल्याण सभापती हरीश डावरे, अँड. शितल चव्हाण, दत्ता गायकवाड, संजय सरवदे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, केशव सरवदे, शहाजी मस्के, एस. आर. गायकवाड, रविकिरण बनसोडे, मिलिंद रोकडे, अण्णासाहेब पवार, गोविंद भंडारे, बाबा औटी, युवराज जोगी, अँड. सुखदेव होळीकर, तिप्पा बनसोडे, सिराज काजी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते महिला वनागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.