भूम (प्रतिनिधी)- 06 डिसेंबर2024 रोजी श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी श्रीमान राहुल भट्टी, कार्यक्रमाचे पाहुणे के. एन.थोरात माजी सह लेखाधिकारी पंचायत समिती भूम व ॲडव्होकेट बाळासाहेब सुकाळे, संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सतीशराव देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, बांगर, जाधव या सर्वांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतिचे पूजन करण्यात आले व अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.