धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती अभिमान लोंढे यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाची नुकतीच डिलीट ही मानक पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मारुती लोंढे यांनी डिलीट ही मानक पदवी प्राप्त केली आहे. 

यापूर्वी डॉ. मारुती लोंढे यांनी 32 संदर्भ ग्रंथ व क्रमिक पुस्ताकांचे लेखन केलेले आहे.63 शोधनिबंध सादर व प्रकाशित केलेले आहेत.दोन लघुपटांचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे तर ते अनेक वेळा नेट ची परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत. डॉ.मारुती लोंढे यांची वळण ही ग्रामीण कादंबरी सुप्रसिद्ध आहे.त्यांनी   अनेक वेळा स्पर्धा परीक्षा व नेट सेट या विषयावर आकाशवाणीवर मुलाखती दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी स्पर्धा परीक्षा व नेट सेट या विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय एकूण सहा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. या कार्याबद्दल डॉ. मारुती लोंढे यांना प्रा. प्रमोद शहा, प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशात त्यांचे वडील अभिमान लोंढे, आई स्व हिराबाई लोंढे, भाऊ अजून लोंढे, वहिनी शिला लोंढे यांचा मोलाचा वाटा आहे. याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिव प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे , मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, माजी सहसचिव प्रशासन डॉ. अशोक करांडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, श्री विष्णुभाऊ कसबे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल डॉ. मारुती लोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top