उमरगा (प्रतिनिधी)-  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालाजी नगर शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव पवार यांना सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

बाबुराव पवार हे शिक्षण क्षेत्रात गेली 36 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. या प्रदीर्घ शैक्षणिक कार्यात दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे सल्लागार म्हणून काम करत असताना समाजातील गरजू व दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, सोनाली वरवटे यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व शाळेतील सर्व शिक्षक वर्गाकडून सत्कार करण्यात आला.


 
Top