धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्यामध्ये बालाघाटाच्या डोंगर रांगाच्या परिसरात, हजारो पावन चक्की उभारल्या गेल्या असुन अजुनही काहीची उभारणी चालु आहे. परंतु सदर पवनचक्की कंपन्या गरीब शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत आहेत. शेतक-यांची कमी क्षेत्राची जमीन खरेदी करून,त्याच्या जास्त क्षेत्रावर ताबा मिळवणे.रस्त्यासाठी जमीन खरेदी न करता दमदाटी करून बेकायदेशीर रस्ता बनविणे. पिकांची नासधूस करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणे.धमक्या देऊन अतिशय कमी किमतीत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरेदी करणे. बाहेरील गुंड व बाऊंसर आणून शेतक-याला धमक्या देणे. अशा प्रकारची गुंडागर्दी करीत आहेत. या गुंडागर्दीवर प्रशासनाने लगाम लावावा अशी मागणी फुक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

अशा प्रकारचे बेकायदेशीर व अनैतिक कारस्थाने सध्या या पवनचक्की कंपन्यांकडून महाराष्ट्रात चालू आहेत. तसेच केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हे अशाच प्रकरणाचे बळी ठरले आहेत.  तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील गीतांजली गाटे या महिला शेतकऱ्याची जमीन अशाच एका पवनचक्की कंपनीने जबरदस्तीने ताब्यात घेतली आहे. त्यांनी विरोध केला असता, गुंड पाठवुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. 

शासनाने यात वेळीच लक्ष नाही घातल्यास, संतोष देशमुख सारख्या आणखी हत्या होतील. इतकेच नाही तर कंपनीच्या दडपशाहीच्या भीतीने, शेतकरी आत्महत्या सारख्या घटनाही भविष्यात घडू शकतात. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून शासनाकडून या कंपन्यांसाठी आदर्श आचार संहिता राबविण्यात यावी. अशी फुक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धर्मवीर कदम, सचिव गणेश वाघमारे,  रघुनाथ भोसले, अब्दुल लतिफ, अलिशान कुरेशी, प्रभाकर गपाट, हणुमंत पवार, सुभाष पवार, रमेश बाराते, यु व्हि माने, सुरेश शेळके सह इतर उपस्थित होते.

 
Top