तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे नगर परीषदने मागील नऊ महिन्यापासुन शहरातील स्वच्छतेचा ठेका असलेल्या एजन्सीचे बिल अदा करण्यास असमर्थ ठरल्याचा पार्श्वभूमीवर स्वछता ठेकेदाराने कचरा संकलन थांबवल्याचे समजते.
नगर परीषद स्वछता ठेका बिल पंधरावा वित्त आयोगातुन दिले जाते. माञ पंधरावा वित्त आयोगाचे पैसे मागील नऊ महिन्या पासुन न आल्याने व स्वछता ठेका बिल नगर परीषद फंडातुन अदा करणे अशक्य असल्याने पंधरावा वित्त आयोगातील पैसे येवुन ते मिळाल्यानंतरच स्वछता ठेकेदार तिर्थक्षेत्र तुळजापूर शहराची स्वछता करणार असल्याचे समजते. सध्या नगर परीषद 35 कायम कर्मचारी व वाहनासाठी बारा चालक घेऊन शहरात स्वछता केली जात आहे. पण स्थानिक चाळीस ते पंचेचाळीस हजार नागरिक दरारोज येणारा भाविकांचे कचरा संकलन शहर स्वछता एवढ्या कर्मचाऱ्यांवर शक्य नसल्याने याचा परिणाम शहरातील कचरा संकलन व स्वछतेवर होणार आहे.
मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा, शारदीय नवरात्र उत्सव, यात्रा कालावधीत तर वीस ते तीस टन कचरा संकलन करावे लागते. यासाठी शेकडो कामगार, वाहने लावावी लागतात. तुळजापूर शहरातील नागरिकांकडून कचरा पडला की लगेच ओरडा करतात. त्यांना चोवीस तास सेवा द्यावी लागते. मात्र, दिपावली सारख्या सणात ही बिल न दिल्याने कामगारांना दिवाळी साजरा करता आली नाही. यामुळे तुळजापूर नगर परीषदकडे स्वच्छता ठेकेदार यापुढे येथील ठेका घ्यावा का नाही या मनस्थितीत आले आहे.
सत्ता स्थापन झाल्याने 15 व्या वित्त आयोगाचे पैसे येण्याची आशा !
नगर परीषद फंडातुन विद्युत पाणीपुरवठा सह अन्य बिले काढावे लागतात स्वच्छतेचे महिन्याला बारा ते तेरा लाख रुपये बिल काढणे अशक्य प्राय गोष्टी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी हतबल असल्याने स्वछता ठेकेदाराने पैसे मिळेपर्यत स्वछता काम बंद केल्याचे समजते. आता मुख्यमंत्री, उपमुखमंञी पदाची शपथविधी पार पडल्याने लवकरच पंधरावा वित्त आयोगाचे पैसे येथील व स्वछता ठेकेदारचे बिल अदा होईल अशी अपेक्षा शहरवासियांमधुन व्यक्त केली जात आहे.