उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिरात गुरुवार, ( दि ०२) पासून सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील मुळज येथील हनुमान मंदिरात प्रतिवर्षी भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सप्ताहाचे हे ४५ वे वर्ष असल्याने यावर्षी सोहळ्यात दररोज पहाटे काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरीजागर आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तर सप्ताहात गुरूवार, (दि ०२) पासून बुधवार, (दि ०८) पर्यंत दररोज दु ४ ते ५ हभप मधुकर गुरव उमरगा, अवधूत पूरी महाराज आष्टा (ज ), आशोक जोशी, गरजे गुरुजी माळेगाव , भिम महाराज व कमलाकर महाराज मुळज यांची प्रवचन सेवा होणार आहे. तसेच गुरुवार, (दि ०२) पासून दररोज रात्री ९ ते ११ हभप हभप हरी महाराज लवटे अचलबेट देवस्थान, मोहन महाराज, विठ्ठल महाराज पैठणकर, ओंकार महाराज मळगी, कान्होंबा महाराज देहूकर, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. तर बुधवार, (दि ०८) रोजी सकाळी १० ते १२ हभप माधव महाराज नामदास यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. सप्ताहात दररोज नामवंत गायक व मृदंगवादक यांचे संगीत भजन तसेच परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहून सेवा देणार आहेत. तरी परिसरातील भाविकांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भजनीक मंडळ व मुळज ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.