धाराशिव (प्रतिनिधी) -परभणी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील सविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत निविदाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की,परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भारतीय संविधानाची प्रतीकात्मक प्रतिमा बसवण्यात आली होती ती प्रतिमा दि.10/12/2024 रो. सायंकाळी 5.वां दरम्यान एका जातीयवादी समाजकंटकाने तोडफोड केली या हरामखोरावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावा तसेच या व्यक्तीला माथेफिरू म्हणून पोलीस प्रशासनाने वाचवण्याचा प्रयत्न करू नये हे कृते त्याने जाणून-बुजून केलेले आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या जातीवादी, देशद्रोही कृते करणाऱ्या इसमावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, अरुणकुमारमाने,विशाल माने,यशवंत पेठे,आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.