धाराशिव दि. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील एकुण १० प्राथमिक आरोग्य केंद्राची केंद्र शासनाने नेमलेल्या पथकाकडून तपासणी करण्यात आली व त्यांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट आरोग्य संस्था म्हणुन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाअंतर्गत रुग्णांना देत असलेल्या आरोग्य सेवा या शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन देण्यात याव्यात तसेच त्याचे सर्व कामकाजाचे अहवाल अदयावत ठेवण्यात यावेत.रुग्णालयीन अंतर्गत व परिसर स्वच्छता ठेवण्यात यावी. यासह इतरही बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

 सर्व प्रथम संस्थास्तरावर संबंधित संस्था प्रमुख आपल्या आरोग्य संस्थेची चेक लिस्टनुसार तपासणी करतात व त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संस्था प्रमुख त्रुटीची पुर्तता करण्यासाठी तालुकास्तर आणि जिल्हास्तरावरुन अधिकाऱ्यांची मदत घेऊन त्याची पुर्तता करतात.

ही गुणवत्ता टिकून राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांचे मोलाचे सहकार्य संबंधित संस्थांना मिळत आहे.त्यानंतर राज्यस्तरावरुन नेमण्यात आलेल्या पथकामार्फत तपासणी करण्यात येते.त्यामध्ये आरोग्य संस्थांचे कामकाज उत्कृष्ट असल्यास त्यांची शिफारस केंद्र शासनाने नेमणुक केलेल्या पथकामार्फत तपासणी करण्यासाठी केली जाते. 

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये उर्वरीत एकुण १३ प्राथमिक आरोग्य केंद्र,६१ आरोग्य उपकेंद्र व १ स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय -४, ग्रामीण रुग्णालय - ७ या निवड करण्यात आलेल्या संस्थांची तपासणी पुर्व कार्यशाळा टाटा सामाजिक संस्था तुळजापुर येथे जिल्हा परिषदेचे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र प्राचार्य डॉ.संतोष कडले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर व टाटा सामाजिक संस्था तुळजापूरचे संचालक डॉ. बाळकृष्ण राक्षसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी जिल्हास्तरीय अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, डॉ.शिवाजी फुलारी निवासी वैद्यकिय अधिकारी ( बाह्य संपर्क ),डॉ.दिपक मेंढेंकर,वैद्यकिय अधिकारी,जिल्हा प्रशिक्षण संघ धाराशिव, डॉ.रफिक अन्सारी,किशोर गवळी,किरण बारकुल,शरद हिंगमिरे,किशोर तांदळे व जिल्हयातील वैद्यकिय अधिक्षक,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सेविका उपस्थित होते .
 
Top